90 युवकांनी केले रक्तदान
मोहोळ : ईगल आय मीडिया
आष्टीतील बाळराजे पाटील युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश (भैय्या) पाटील यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 90 युवकांनी रक्तदान केले.
कोरोना (कोव्हिड-१९) विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताची कमतरता भासत आहे. त्या अनुषंगाने महेश पाटील यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत रविवार ( दि २6 जुलै) रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत जि.प.प्राथ.शाळेत रक्तदान शिबिर संपन्न झाले. सिद्धेश्वर रक्तपेढी,सोलापूर यांच्या सहकार्याने पार पडलेल्या शिबिरात ९० लोकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले.
या शिबिराचे ऊदघाटन माजी सरपंच व लोकनेते साखर कारखान्याचे संचालक मदनसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच ऐश्वर्या शैलेंद्र पाटील व काँग्रेसचे नेते देवानंद गुंड – पाटील, पोलीस पाटील खासेराव पाटील , ग्रा.पं. सदस्य बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख ऊपस्थित होते.
जागतिक पातळीवर कोरोनाचा विषाणू थैमान घालत असताना आरोग्य खात्यातील सर्व लोकं जीवाची पर्वा न करता राञंदिवस रुग्णांची सेवा करत आहेत. त्यामध्ये आपला खारीचा वाटा असावा या ऊद्देशाने रक्तदान केल्याचे रक्तदात्यांनी सांगितले.
प्रत्येक रक्तदात्यास सॕनिटाईझर , मास्क, प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोळ्या भेट देण्यात आल्या.
या शिबीरास विकास डंके , महेंद्र माने , औदुंबर खताळ, तात्या सावंत , अनिकेत पाटील , सनी पाटील, ज्ञानेश्वर पाटील , दौलत जाधव, जावेद सय्यद यांनी सहकार्य केले.