मंगळवेढ्याच्या मुलीचे गणितात यश !

आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत उन्नती मर्दा प्रथम


मंगळवेढा : ईगल आय मीडिया

मॅटस् आयोजित ऑनलाईन आंतरराष्ट्रीय अबॅकस ऑलिम्पियाड स्पर्धेत मंगकवेढ्याच्या मुलीने 3 मिनिटांत 80 गणिते सोडवली आहेत. गुरू अबॅकस मंगळवेढा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. उन्नती महेश मर्दा हिने या स्पर्धेत ए कॅटेगरी मध्ये ३ मिनिटांत ८० गणिते सोडवत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून चॅम्पियनशिप मिळवली.

ए कॅटेगरी मध्ये उन्नतीने सर्वांत लवकर म्हणजे ३ मिनिटांत ८० गणिते सोडविले. ५ ते १४ वयोगटातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.

गुरू अबॅकस मंगळवेढा शाखेचे २८ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. मंगळवेढा शाखेचे १४ विद्यार्थीनी चॅम्पियनशिप मिळवले. गुरू अबॅकस मंगळवेढा प्रमुख गणेश मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!