7 वर्षे वयोगटात मिळवली 7 वी रँक
मंगळवेढा : ईगल आय मीडिया
मॅटस् आयोजित ऑनलाईन आंतरराष्ट्रीय अबॅकस ऑलिम्पियाड स्पर्धा २०२० या मध्ये गुरू अबॅकस मंगळवेढया च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.या स्पर्धेत झेड कॅटेगरी मध्ये झेड वन मध्ये समीक्षा सचिन इंगळे हिने तीन मिनिटात साठ गणिते सोडवत आंतरराष्ट्रीय स्तरावर सातवा क्रमांक मिळवला आहे तसेच चॅम्पियनशिप मिळविली. अनुक्रमे तीन ते सात या विद्यार्थ्यानी समान वेळेतच गणिते सोडवली.
५ ते १४ वयोगटातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. गुरू अबॅकस मंगळवेढा शाखेचे २८ विद्यार्थी व पंढरपूर शाखेचे ६ विद्यार्थी या स्पर्धेत चमकले आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून एकूण 200 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला होता .
या स्पर्धेत झेड कॅटेगरी मध्ये ३ मिनिटांत ६० गणिते सोडवणे सोडवणे अनिवार्य होते. समीक्षा इंगळे नगरपालिका मुलींची शाळा क्रमांक दोन मध्य इयत्त दुसरीत शिकत असून यशस्वी विद्यार्थ्यांना गुरू अबॅकस मंगळवेढा व पंढरपूर शाखेचे प्रमुख गणेश मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.