कोर्टी जवळ अपघातात 1 ठार : कारने बापलेकास ठोकरले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

कोर्टी ( ता.पंढरपूर ) येथील श्री नगरी वसहतीजवळ पंढरपूर कडे मोटारसायकल वरून निघालेल्या बाप लेकास चारचाकी वाहनाने पाठीमागून ठोकरले. या अपघातात मुलाचा मृत्यू झाला असून बाप गंभीर जखमी झाला आहे. सिद्धनाथ दत्तात्रय वाघमोडे ( रा. कोर्टी ) असे मयत युवकाचे नाव आहे.

कोर्टी येथील सिद्धनाथ दत्तात्रय वाघमोडे हा युवक सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आपल्या वडीलांसह पंढरपूर कडे निघाला होता. त्यावेळी श्री नगरी वसाहती जवळ आल्यानंतर या मोटार सायकल ( क्र. mh 13, cd 2311 ) ला पाठीमागून येणाऱ्या कार ( क्र. ap16, bg 5544) वाहनाने धडक दिली.

यावेळी दोघेही बापलेक उडून पडले आणि जबर मार लागल्याने मुलगा सिद्धनाथ ( वय 22 वर्षे ) याचा मृत्यू झाला तर वडील दत्तात्रय हे गंभीर जखमी झालेत.

One thought on “कोर्टी जवळ अपघातात 1 ठार : कारने बापलेकास ठोकरले

  1. खरंच वाहने बेदरकार धावत आहेत, अशांना वेगापेक्षा आपला जीव महत्वाचा हे कोण सांगणार? यासाठी स्वतः हुन काळजी घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!