मराठा सेवा संघाच्या 30 व्या वर्धापनदिनी झाला सन्मान
पंढरपूर : ईगल आय मीडिया
सांगोला अर्बन बँकेच्या पंढरपूर शाखेचे व्यवस्थापक ऍड. शिवाजी नामदेव दरेकर यांना मराठा सेवा संघाच्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार देण्यात आला. येथील राजमाता जिजाऊ मुलींचे वसतीगृह येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींना कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सांगोला अर्बन बँकेचे पंढरपूर येथील शाखा व्यवस्थापक ऍड. शिवाजी दरेकर यांना यावेळी त्यांच्या बँकिंग क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
सुमारे 20 वर्षे रुक्मिणी महिला सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक म्हणून काम केलेल्या दरेकर यांनी गेल्या 9 महिन्यापासून सांगोला अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. कोरोनाच्या काळातही पंढरपूर शाखेचे कामकाज उत्कृष्ट रित्या चालवल्याबद्दल त्यांचा कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.