सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील पुरस्कारांसाठी आवाहन

स्व.श्री.अप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आवाहन

पंढरपूर : eagle eye news

 येथील प्रसिद्ध  साहित्यिक, नाट्यकर्मी, वृत्तपत्रलेखक स्व.श्री.अप्पासाहेब चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र शाल,हार व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून या पुरस्कारासाठी जिल्हा स्तरावरावरून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील व्यक्तींनी आपले प्रस्ताव श्री.अमरसिंह आप्पासाहेब चव्हाण, वैष्णव सदन, लक्ष्मी नगर,क्रांतिसिंह नाना पाटील चौक, पंढरपूर या पत्त्यावर २० एप्रिलपूर्वी पाठवावेत,  असे आवाहन  संस्थेच्यावतीने करण्यात  आले आहे. अधिक माहितीसाठी श्री.रविराज सोनार – ९९२२५१४३००, डॉ.श्री.सचिन लादे – ७५८८२१६५२६ व श्री.मंदार केसकर – ९४२२३८०१४६ यांच्याशी संपर्क साधावा

साहित्यिक क्षेत्रातील पुरस्कारासाठी आजपर्यंत प्रकाशित झालेल्या एका साहित्यकृतीबरोबर साहित्यिकाने आपले परिचय पत्र , सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कारासाठी परिचय पत्र व कार्याचा आढावा पाठविणे आवश्यक आहे. स्व.श्री.आप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने येत्या चार मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार दिले जाणार आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!