प्रा. आप्पासाहेब चव्हाण स्मृती पुरस्काराचे वितरण
फोटो
प्रा. अप्पासाहेब चव्हाण स्मृती पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
पंढरपूर : eagle eye news
लोकमान्य विद्यालयातील विद्यार्थीप्रिय शिक्षक आप्पासाहेब चव्हाण हे पंढरपुरातील बहुआयामी व्यक्तिमत्व होते, त्यांच्या संस्कार व विचारांचा वारसा पुढे चालविणे ही पंढरपूरकरांसाठी गरजेची गोष्ट आहे. असे प्रतिपादन कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी केले. स्व.आप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने होते.
स्व.आप्पासाहेब चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्यावरील आठवणींचा लेखसंग्रह संस्कारदीप या स्मरणिकेचे प्रकाशन व स्मृति पुरस्काराचे वितरण प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख,जिल्हा परिषद सदस्य प्रा. सुभाष माने, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, हरीश गायकवाड, अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, तेरणा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंडितराव देशमुख व आप्पासाहेब चव्हाण यांच्या पत्नी श्रीमती सुवर्णा चव्हाण या उपस्थित होत्या.
पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या वतीने डॉ.शिवाजी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. उमा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.मिलिंद परिचारक, सतीश मुळे, सुभाष माने,अमरसिंह देशमुख यांनी स्व.आप्पासाहेब चव्हाण यांच्या आठवणी सांगून मनोगते व्यक्त केली. वामनराव माने यांनी अध्यक्षीय समारोप केला. शेवटी आभार प्रशांत पाटील यांनी मानले तर डॉ.सचिन लादे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्याचा पुरस्कार वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्ते आनंद नगरकर यांना, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ शिवाजी शिंदे यांना तर साहित्यिक क्षेत्रातील पुरस्कार लेखक प्रा.सिताराम सावंत यांना देण्यात आला. श्रीकांत बडवे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रताप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.