अरुण लाड यांना क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांती अग्रणी लाड बापूंचा वारसा

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

टीम : ईगल आय मीडिया
क्रांतीसिंह नाना पाटलांच्या ब्रिटिशांविरुद्धच्या पत्री सरकारमध्ये क्रांतीअग्रणी जी डी बापू -लाड यांचे योगदान मोठे होते. स्वातंत्र्य चळवळीचा महान वारसा असलेल्या पुणे पदवीधरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या विजयाने क्रांतिसिंह नाना पाटील आणि क्रांतीअग्रणी जी. डी. बापू -लाड यांचे स्वप्न साकार करूया, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.


भैया माने यांची नावे राज्यपातळीवर असती
श्री. मुश्रीफ म्हणाले, या मतदार संघातून अर्ज भरलेले भैया माने यांनी पदवीधरच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये एक उत्कृष्ट संघटक म्हणून चांगले काम केले आहे. ते हाडाचे कार्यकर्ते आणि पक्षाचे जिद्दी सैनिक आहेत. त्यांची आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची चर्चा झाली आहे. शरद पवार यांनीही त्यांना तसा निरोप पाठविलेला आहे. त्यांनी माघार घ्यावी, अशी विनंती श्री. मुश्रीफ यांनी केली.

श्री मुश्रीफ म्हणाले, या निवडणुकीत अरुण लाड यांची अपार मेहनत फळाला आणूया. कारण, गेल्या तिन्ही निवडणुकात त्यांनी अपार कष्ट, मेहनत घेतली. परंतु, यश आले नाही. यावेळेला सर्वच कार्यकर्ते हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करुन या मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा फडकावतील. अरुण लाड यांच्या विजयात कोल्हापूर जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असेल

Leave a Reply

error: Content is protected !!