आषाढी एकादशीला स्थानिक नागरीकांना श्रीविठठ्ल दर्शनाची परवानगी दया : दिलीप धोत्रे

पंढरपूर : ईगल आय मीडिया

यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर आषाढी यात्रा रद् झाली आहे.त्यामुळे एकादशीच्या दिवशी पंढरपूरकर नागरीकांना सोशल डिस्टसींगच्या नियमांचे पालन करीत श्रीविठठ्लाचे दर्शन घेण्याची परवानगी दयावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी श्रीविठठ्ल रुक्मीणी मंदिर समितीकडे केली आहे.

 प्रतिवर्षी आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपूरात येत असतात. त्यामुळे आषाढी एकादशीला श्रीविठठ्लाचे दर्शन घेणे स्थानिक भाविकांना शक्य होत नाही.  मात्र यंदा आषाढी यात्राच होणार नसल्याने आषाढी एकादशीस स्थानिक भाविकांना श्रीविठठ्ल दर्शनासाठी परवानगी दयावी.
पंढरीचा पांडुरंग हा युगेंनयुगे भक्तांसाठी कमरेवर हात ठेवून उभा आहे.भक्त आले नाहीत तर देवालाही करमत नाही.कोरोना मुळे गेले तीन महीने भाविकांसाठी मंदिर बंद आहे. पंढरपूर कोरोनामुक्त आहे त्यामुळे पंढरीच्या नागरीकांना विठुरायाचे दर्शन घेवु दयावे अशी मागणी आहे. दर्शनासाठी गर्दी होवु नये म्हणून शहराचे प्रभागा प्रमाणे भाग पाडून प्रत्येक भागाला ठरावीक वेळ देण्यात यावी. त्यासाठी मास्क वापरुन,सोशल डिस्टसींगचे नियम पाळणे  व सॅनिटायझरचा वापर करुन व स्थानिक भाविकांचे पंढरपूरचे रहिवाशी असल्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड बघुनच दर्शनासाठी सोडण्यात यावे अशीही सूचना धोत्रे यांनी केली आहे. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना निवेदन दिले आहे. या प्रसंगी मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड ,मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,शहर अध्यक्ष नागेश इंगोले, सिध्देश्वर गरड व समाधान डुबल ऊपस्थित हौते.

एकादशी दिवशी बाहेरचे भाविक पंढरीत येणार नसल्याने स्थानिक भाविकांना दर्शनासाठी सोडावे,तरी स्थानिकांना आषाढी एकादशीला दर्शन मिळण्याची मोठी संधी चालून आली आहे.दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना मास्क,सॅनिटायझर व हॅन्डग्लोज पुरविण्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेत आहे.

: दिलीप धोत्रे
सरचिटणीस,
महाराष्ट्र मनसे 

Leave a Reply

error: Content is protected !!