पंढरपूर मतदार संघातील विविध प्रश्नांचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समाधान अवताडे यांनी मांडले गाऱ्हाणे

पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोना प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस हे सोलापूर जिल्ह्याच्या  दौऱ्यावर आले असता श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान  आवताडे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी श्री समाधान आवताडे व देवेंद्र फडवणीस  यांची पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत चर्चा झाली.
चेअरमन समाधान आवताडे यांनी देवेंद्र फडवणीस यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यात समाधान आवताडे यांनी पंढरपुरात कोविड हॉस्पिटल निर्मितीचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असून त्याकडे लक्ष देऊन ते लवकरात लवकर नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आणि वारी रद्ध झाल्याने पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील विविध व्यापारी आणि शेतकरी हे आर्थिक विवंचनेत सापडले असून त्यांच्या करिता महाराष्ट्र शासनाकडून वेगळ्या पॅकेजची मागणी आपण माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे करावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे  केली.

याप्रसंगी आ.सुभाष देशमुख, आ.विजयकुमार देशमुख, खा.रणजितसिह नाईकनिंबाळकर, जयसिध्देश्वर स्वामी, आमदार राजा राऊत, .आमदार सचिन कल्यानशेट्टी, आमदार मा.रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दिलीप चव्हाण, फॅबटेक शुगरचे चेअरमन मा.श्री. सरोजभाई  काझी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!