वैद्य डॉ. आबासाहेब रणदिवे यांचे मोफत योगदान
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहरात वाढत असलेला कोरोनाचा प्रभाव पाहता वैद्य डॉ आबासाहेब रणदिवे यांच्यावतीने आयुर्वेदिक काढा वितरण करण्यात आला.
उपविगीय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आबासाहेब रणदिवे यांनी स्वखर्चातुन या परिसरात मोफत प्रतिकार क्षमता वाढवणारा काढा वाटप केले. गुरुवारी ( दि. १६ जुलै) पासुन सुरु केले असुन, सलग दहा दिवस हा काढा वाटप करण्यात येणार आहे. भर पावसात सुध्दा सकाळी लोकांनी उपस्थित राहुन या काढ्याचे सेवन केले.
यावेळी नगरसेवक कृष्णा वाघमारे, माजी नगरसेवक नागेश यादव, अॕड. किशोर खिलारे, अॕड. बादल यादव आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. तसेच आभिजीत कांबळे, लखन रणदिवे, नागेश लोखंडे, खंडु गायकवाड, रणजीत कांबळे, शिलाताई देवकुळे, शितलताई अवघडे यांनी या परिसरात जनजागृती करुन घरोघरी काढा वाटपाचे काम केले.