बाभुळगाव येथे मतदार जनजागृती दिन साजरा


पंढरपूर : ईगल आय मीडिया

तालुक्यातील बाभूळगाव येथे सोमवार ( दि. 25 रोजी ) प्रभात फेरी काढून मतदार जनजागृती दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कोरोना निर्मूलन करण्याची शिक्षक, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी शपथ घेतली. तसेच मतदानाचा हक्क सर्वानी बजावून लोकशाही बळकट करण्याचा मानस व्यक्त केला.

केंद्र प्रमुख भोसले यांनी पाचवी ते आठवी पर्यंत ची शाळा बुधवार दि. 27 पासून सकाळी 11 ते 2 यावेळेत सुरु राहील असे जाहीर केले. दरम्यान सर्व शिक्षकांनी कोरोना चाचनी करून शाळेत हजर राहावे असे सुचवले.

दरम्यान, सर्व शाळा व परिसर स्वछ करण्यात आला. गावातील मतदानाचा टक्का वाढवण्याबरोबर संपूर्ण गाव साक्षर करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षक गणेश लटके, मेटकरी, महेश कथले, ग्रामपंचायत सदस्य बलराज चव्हाण, मुख्यध्यापिका यांनी विचार व्यक्त केले.

यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य गणेश चव्हाण, अशोक सरवदे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य दगडू चव्हाण, तानाजी चव्हाण, ग्रामसेवक इंगोले, लिपिक मुन्ना चव्हाण, पोलीस पाटील आनंद कोळी, नितीन कोरके, नवनाथ विठ्ठल माळी, रेणुका विद्यालयाच्या मुख्यध्यापिका राखी गाभूड, अजिनाथ सरवदे, अरविंद सरवदे आदींसह शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!