2 वर्षांची प्रतीक्षा : शेतकऱ्यांना महापूर नुकसान भरपाई नाही

बळीराजा शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा ईशारा

पंढरपूर : ईगल आय मीडिया


महापुरामुळे बाधित झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुसकान भरपाई मिळालेली आहे, मात्र पंढरपूर तालुक्यातील 700 ते 800 शेतकरी अध्याप एक दमडीही मिळाली नसून त्वरित शासनाच्या वतीने नुसकान भरपाई द्यावी अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भात तहसीलदार व प्रांतअधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

2019 आली भीमा नदीला आलेल्या महापुरातमध्ये शेती, पिकाचे नुकसान झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील शेती पिकांचे पंचनामा होऊन सुद्धा बाधित शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत नुसकान भरपाई मिळाली नाही. गेली दोन वर्ष होऊसुद्धा अध्याप भरपाई मिळालेली नसून तालुक्यातील 700 ते 800 शेतकरी वंचित राहिले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे, तरी त्वरित नुसकान भरपाई मिळावी अशी मागणी सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांनी केली.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, जिल्हासंघटक शेखर कोरके, सर्जेराव शेळके, रामेश्वर झांबरे, नितीन गावडे, औदुंबर सुतार, विष्णू भोसले, अनंता लामकाने, अंबादास भोई, अनिल शिंदे, रणजित शिंदे, सुरज भांगे मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!