भाळवणीत शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन

बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हटवल्या प्रकरणी निषेध

पंढरपूर : ईगल आय मीडिया
कर्नाटक येथील बेळगाव जवळील मानगुत्ती गावामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याऱ्या भाजपा सरकारच्या निषेधार्थ भाळवणी (ता. पंढरपूर) येथे शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून जोडोमारो आंदोलन करण्यात आले.
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येडीरुप्पा यांचा पुतळा तयार करून त्या पुतळ्याला येथील शिवकालीन वेशिजवळ जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसैनकानी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी- जय शिवाजी, अरे आवाज कोणाचा..शिवसेनेचा ! असा नारा देत कर्नाटक भाजपा सरकार मुर्दाबादाच्या घोषणेने सारा परिसर दणाणून सोडला होता.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, दिलीप भानवसे, प्रवीण शिंदे, शकील काझी, महेश इंगोले, पोपट इंगोले, जयसिंग पवार, भैय्या पटेल, श्रीराम माने, पिंटू हिंगमीरे, युवराज पाटील, महादेव पवार, अजित राऊत, रमेश निराळी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!