युवकांनी गावालाही आत्मनिर्भर करावे : आ. सुभाष देशमुख भंडीशेगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम



पंढरपूर : ईगल आय मीडिया
गावातील स्थानिक युवकांनी आता पुढे येऊन व्यवसाय करावा, लोकांची गरज काय आहे ते बघाव त्यानुसार व्यवसाय निवडावा, स्वतःही आत्मनिर्भर व्हावे आणि गावालाही आत्मनिर्भर करावे, माझ्याकडून जी शक्य आहे, ती मदत करू, असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख यांनी भंडीशेगाव ( ता.पंढरपूर) केले.

यावेळी म्हाडा चे अभियंता सुनील ननवरे, पंचायत समिती सदस्या पल्लवी कंडरे,उपसरपंच संतोष ननवरे,वन विभागाचे अधिकारी किशोर आहेर, सतीश रणखांबे, ज्ञानेश्वर गिड्डे, डॉ. अनिल कंडरे , अशोक येलमार, विश्वास सुरवसे, गणेश पाटील, सावता ननवरे, डॉ. श्रीधर येलमार, अरुण ननवरे , महेंद्र येलपले, अनिल विभूते उपस्थित होते.
आ. सुभाष देशमुख यांनी मुबई येथील आलिशा कंडरे यांनी सुरु केलेले ड्रीम ऍग्रो कृषी पर्यटन केंद्र व सोलापूर सोशल फाऊंडेशन च्या कार्यालयास भेट दिली. नव्याने सुरू होत असलेल्या व्यायामशाळेची पाहणी केली. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे वृक्षारोपण केले.


यावेळी आ.सुभाष देशमुख यांनी भंडीशेगाव येथील 42 एकर गायरान जमिनीवर मुबई येथील बांधकाम व्यावसायिक अजित कंडरे यांच्या कल्पकतेने साकारलेल्या ड्रीम गार्डन ला भेट दिली. ड्रीम गार्डन हा प्रोजेक्ट 42 एकर गायरान पडीक जमिनीवर साकारला असून येथे राष्ट्रीय औस्निक प्रोजेक्ट(एन. टी. पी.सी) च्या सहकार्याने वन विभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने 17500 वृक्ष लागवड करण्यात आलीआहे. लवकरच या ठिकाणी राज्यातील पाहिले सार्वजनिक नक्षत्र गार्डन तयार करण्याचा मानस असल्याचे वन अधिकारी किशोर आहेर यांनी सांगितले,

Leave a Reply

error: Content is protected !!