माजी उपसरपंच ननवरे यांची माहिती
पंढरपूर : ईगल आय मीडिया
भंडीशेगाव ( ता.पंढरपूर ) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत लवकरच बुद्ध पार्क व विपश्यना केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भंडीशेगावचे माजी उपसरपंच संतोष ननवरे यानी दिली. दरम्यान, या ठिकाणी उद्योजक अजित कंडरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पुढील वर्षापर्यंत या ठिकाणी बुद्ध पार्क व विपश्यना केंद्र साकारणार असल्याचे ननवरे यांनी सांगितले. यावेळी पुणे येथून आलेले महाराष्ट्रतील नामवंत आर्किटेक्ट निलेश राहटे हे उपस्थित होते.
भगवान गौतम बुद्ध यांचे प्रज्ञा, शील,करुणा,याबद्दल चे तत्वज्ञानसमाजासमोर लिखित स्वरूपात तसेच ऑडिओ, व्हिडिओ व लेसर शो च्या माध्यमातून समाजासमोर मांडून बुद्ध पार्क तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे विपश्यना या दोन हजार पाचशे वर्षांपूर्वीच्या साधनेची माहिती येथे असेल .स्वतः ला बदलण्याची साधना म्हणजे विपश्यना होय ,शरीर व मन यांचा ताळमेळ घालणे व विविध आजारापासून दूर राहण्यासाठी विपश्यना गरजेची असून ही विपश्यना जगातील सर्वात प्राचीन काळापासून चालत आलेली साधना आहे ,आशा प्रकारचे विपश्यना केंद्र व बुद्ध पार्क भंडीशेगाव येथे साकारण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन ननवरे यांनी केले आहे .
या बुद्ध पार्क व विपश्यना केंद्र तयार करण्यासाठी पुणे येथील नामांकित आर्किटेक्ट निलेश राहते हे मार्गदर्शन करीत आहेत.
यावेळी अरुण ननवरे ,सावता ननवरे,अमोल ननवरे,अवधूत ननवरे,डॉ.श्रीधर येलमार,व ग्रामस्थ उपस्थित होते.