भंडीशेगावातील बुद्ध पार्क मध्ये वृक्षारोपण

सोलापूर सोशल फाउंडेशचा पूूढाकार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भंडीशेगाव ( ता.पंढरपूर ) येथील बुद्ध पार्क येथे सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून पंढरपूर चे माजी नगराध्यक्ष अरुण कंडरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच संतोष ननवरे उपस्थित होते.

माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी गेल्या काही वर्षापासून सोलापूर सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून जिल्ह्यातील वेगळेपण दर्शवण्यासाठी समृद्ध गाव ही योजना आखली असून या योजनेअंतर्गत गावाचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भंडीशेगांव येथे सुरू असलेल्या बुद्ध पार्क व विपश्यना केंद्रात वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती संतोष ननवरे व अरुण ननवरे यांनी यावेळी दिली.

भंडीशेगांव येथे सोलापूर सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक अजित कंडरे यांनी सहाशे शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅग चे वाटप केले. तसेच चारशे महिलांना टॉवेलचे वाटप केले,गावातील महिलांना रोजगार मिळावा यासाठी ड्रीम ऍग्रो टुरिझम चे काम सुरू केले, त्याचप्रमाणे गावातील पडीक गायरान बेचाळीस एकर जमिनीवर वन विभागाच्या माध्यमातून आठरा हजार झाडे लावली आहेत. तसेच या ड्रीम गार्डन कडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा झाडे लावली आहेत, गावात व्यायामशाळा असावी यासाठी देखील प्रयत्न केले आहेत. गावात लवकरच लोकमंगल बँकेचे एक सेवा केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती डॉ.श्रीधर येलमार यांनी दिली.

या वृक्षारोपण कार्यक्रमास डॉ.अनिल कंडरे, ग्रामपंचायत सदस्य विश्वास सुरवसे, अरुण ननवरे(मिस्त्री), नितीन ननवरे,अमोल ननवरे, शहाजी ननवरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!