भंडीशेगाव येथे पालखी महामार्गावर रास्ता रोको

वीज तोडणी थांबवा : वीज बिल माफ करा : शेतकऱ्यांची मागणी

फोटो
भंडीशेगाव ( ता. पंढरपूर ) येथे पालखी महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. 

पंढरपूर : eagle eye news
पंढरपूर तालुक्यातील वीज तोडणी तात्काळ थांबवा, विज बिल शंभर टक्के माफ झाले पाहिजे, नादुरुस्त डीपी 24 तासात दुरुस्त करून मिळावा, कायमस्वरूपी शेतकऱ्यांना वीज मोफत मिळावी, अशा प्रमुख मागण्यासाठी भंडीशेगाव ( ता. पंढरपूर )  येथे पालखी महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला, यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

पंढरपूर तालुक्यात सध्या थकीत वीजबिलापोटी वीज कनेक्शन कट करणे, डी पी. उतरवणे अशी मोहीम महावितरण ने हाती घेतली आहे. त्यामुळे गावो गावी शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे . गुरुवारी सकाळी भंडीशेगाव येथे शेतकरी जागृती अभियान यांच्या वतीने या रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी पालखी मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 यावेळी बोलताना, आमच्या मागण्या मान्य न केल्यास शिंदे फडणीस सरकारला एकाही मंत्र्याला रस्त्यावरून फिरू देणार नाही, काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला जाईल असा इशारा  समाधान फाटे यांनी दिला तर  या सरकारला व विरोधी पक्षाला शेतकऱ्याचे काही देणं-घेणं नाही, त्यामुळे सरकार उन्हाळ्यात शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करून नुकसान करीत आहे, असा आरोप   माऊली जवळेकर यांनी केला.

यावेळी शेतकरी संघटनेचे समाधान फाटे, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर, प्रहार संघटनेचे संजय जगताप, पार्थ सुरवसे, शाहजी जगदाळे, माजी उपसरपंच विश्वास सुरवसे, अमोल सुरवसे, तात्या नागणे, विजय कदम, हनुमंत सुरवसे, रमेश शेगावकर, मंगेश ननवरे, आनंदा शेगावकर, संतोष ननवरे, संतोष भोसले, संतोष यलमार, आनंदा शेगावकर ,रामकृष्ण कवडे , विजय सुरवसे मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

One thought on “भंडीशेगाव येथे पालखी महामार्गावर रास्ता रोको

Leave a Reply

error: Content is protected !!