भोसे येथे ९ जानेवारी रोजी शेतकरी मेळावा

ऍड गणेश पाटील यांचा नागरी सत्कार

पंढरपूर : eagle eye news

राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष ऍड गणेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. ९ जानेवारी रोजी भव्य नागरी सत्कार आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सायंकाळी ६ वाजता शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

९ जानेवारी रोजी भोसे गावचे सरपंच, कृषिराज शुगर्स चे चेअरमन आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ऍड गणेश पाटील यांचा ३५ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने ऍड पाटील यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप बाळासाहेब देहूकर आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, शरद लाड, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील, ऍड. दीपक पवार आदी उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय लतीफ तांबोळी, राजेंद्र हजारे, अतुल खरात, विजयसिंह देशमुख, सुधीर भोसले, दिनकर कदम, सुधाकर कवडे, दीपक वाडदेकर, किरण घाडगे, सागर यादव, मुन्ना मोरे, आदिनाथ देशमुख, श्रीकांत शिंदे, रणजित पाटील आदी पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारीउपस्थित राहणार आहेत .

Leave a Reply

error: Content is protected !!