भाजपा किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
उजनी धरणातून भीमा नदीला पाणी सोडण्याचे योग्य नियोजन करावे आणि संभाव्य पूरस्थिती टाळावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
सध्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण चांगल्याप्रकारे असल्यामुळे उजनी धरणामध्ये पाण्याची वाढ होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे ते पाणी नदी वाटे सोडून दिले जाते. त्यामुळे आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. नदीकाठच्या गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे नुकसान होऊन शासन व प्रशासनावर ही प्रचंड ताण येतो. त्यामुळे आपण स्वतः लक्ष घालून उजनीच्या पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, असं योग्य नियोजन करावं व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं होणारे नुकसान थांबवावे, असे या निवेदनात म्हटले आहे.
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने आज सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले. यावेळी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले, भाजप किसान मोर्चाचे माऊली भाऊ हळणवर, प्रा सुभाष मस्के, गणेश अंकुशराव, रासपचे पंकज देवकते, भटुंबरे ग्रामपंचायत सदस्य अजय खांडेकर, विकास डांगे, मारुती जाधव आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.