
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोना काळामध्ये पंढरपूर शहरातील नागरिकांकरिता रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पंढरपूर शहर युवासेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवा सेनेचे शहर प्रमुख महावीर अभंगराव यांनी दिली. रविवार दिनांक 23 मे 2019 रोजी सकाळी 2 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे शिबिर पंढरपूर शहरातील अंबाबाई पटांगण, जुना सोलापूर रोड येथे पार पडणार आहे.
रविवाार, दिनांक 23 मे 2021 रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत अंबाबाई पटांगण जुना सोलापूर रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त युवकांनी यामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन महावीर अभंगराव यांच्यावतीने करण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळामध्ये पंढरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहेत. सध्या असलेला रक्ताचा साठा अपुरा असून त्यात मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज रुग्णांना भासू लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन, पंढरपूर युवा सेना शहर प्रमुख महावीर अभंगराव यांनी रक्त्तदान शिबीर आयोजित केेलेे आहे.