छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने कोविड योद्ध्यांचा सन्मान

पत्रकार मोहन कोळी, अण्णासाहेब पवार सन्मानित

सोलापूर : ईगल आय मीडिया

छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य. सोलापुर जिल्हा व शहर यांच्या कडून अण्णा भाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त पत्रकार व परिचारिका यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली व केंद्रीय अध्यक्ष माननीय प्रतापसिंह शिवाजीराव कांचन-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विशाल अडगळे,किरण बागल, नागेश पवार,स्वप्नील तोडकरी ,भक्तीताई जाधव तसेच छावा क्रांतिवीर सेनेचे सर्व पश्चीम महाराष्ट्र कार्यकारणी जिल्हा व शहर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रथम नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या 1)कुंदन ताकमोगे- जिल्हाध्यक्ष युवक आघाडी सोलापूर विभाग
2) शीतल मोरे- शहर कार्याध्यक्ष
3) अश्विनी सुरवसे- शहर उप-कार्याध्यक्ष
4)करिश्मा शिंदे- मोहोळ तालुका युवती संघटक
5)ज्योती कांबळे- मोहोळ तालुका अध्यक्ष
6)मिनाक्षी भगरे- उत्तर तालुका अध्यक्ष
7) अभिजित काकडे-
मोहोळ तालुका अध्यक्ष वाहतूक आघाडी
8)सोनाली पाटील बाळीवेस विभाग प्रमुख वरील नूतन कार्यकर्त्यांचा पद देऊन गौरविण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

त्यानंतर कोरोना सारख्या महामारी च्या काळामध्ये स्वतःची व कुटुंबाच्या जीवाची परवा न करता पत्रकार बंधू, परिचारिका , मेडिकल व पॅरा मेडिकल स्टाफ,पोलीस बांधव, सफाई कामगार,आशा वर्कर जे सातत्याने रोज काम करतात अश्या सर्व योध्याचा कोविड योद्धा म्हणून सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

सन्मानित पत्रकार विकास कस्तुरे-दैनिक पंढरी भूषण, महेश हनमे-MH 13 न्यूज, वैभव गंगणे-K सिटी न्यूज, विशाल सपकाळ-दैनिक लोकप्रधान,मोहन कोळी-दैनिक सकाळ, भरतकुमार मोरे-उपसंपादक पुण्य नगरी, मकरंद ढोबळे-स्वराज्य न्यूज मराठी, अण्णासाहेब पवार-दैनिक पुढारी, शिवाजी सावंत- स्टार tv9,सुनील कोडगी- लाईव्ह सोलापुर,अभिषेक आदेप्पा, डीपी न्यूज,परिचारिका शितलताई मोरे,परिचारिका रेणुकाताई करडे,युसूफ पिरजादे- sp इंडिया न्यूज,परमेश्वर अवताडे- साप्ताहिक नवदूत, मराठा न्यूज च्या संपादिका स्मिताताई चव्हाण या सर्वांना कोविड योद्धा म्हणून केंद्रीय अध्यक्ष प्रतापसिंह कांचन-पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस केंद्रीय व प्रदेश कार्यकारणी कडून शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रम पार पडण्यास सर्व जिल्हा व शहर पदाधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply

error: Content is protected !!