पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी काँग्रेसचा खोडा

निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यालाच पक्षाची उमेदवारी मिळावी : अशी मागणी केली

पंढरपूर : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजत आहे. अशातच पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची काँग्रेस पक्षाची उमेदवारी वर्षानुवर्षे निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यालाच मिळावी. यासाठीची मागणी काँग्रेसकडील पाच इच्छुक उमेदवारांनी केली आहे. दरम्यान अशी मागणी केल्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारी मध्ये काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी खोडा घातल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुका मंगळवारी जाहीर झाल्या, मात्र अजूनही महाविकास आघाडीचे जागावाटप झालेले नाही. हि जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळेल, असा दावा केला जात असतानाच पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या मतदारसंघातून कार्यकर्त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांना मोठे मताधिक्य मतदार संघातून मिळाले. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला येणाऱ्या विधानसभेत सहज सोपी आहे. असे असताना येणाऱ्या निवडणुकीत केवळ वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी मिळावी. इतर कोणालाही उमेदवारी पक्षाने देऊ नये. अशी मागणी आता जोर धरत आहे.

काँग्रेस पक्षाकडे आदित्य फत्तेपुरकर, रविकिरण कोळेकर , अमोल म्हमाणे, अशोक चेळेकर आणि राजेश लिगाडे यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. या पाचही उमेदवारांनी एकत्र येऊन सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक शिवाजीराव काळगे आणि जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारीची मागणी केली. यावेळी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मोईन शेख , चेतन नरोटे , सूनंजय पवार, अमर सुर्यवंशी , महेश अधटराव, राजेंद्र महाराज मोरे उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!