आयसीआयसीआय बँकेची पीक-कर्ज देण्यास टाळाटाळ !

बँकेवर कारवाई करण्याची स्वाभिमानीची मागणी

मंगळवेढा : ईगल आय मिडीया


शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक करू नये असे सक्त आदेश महाराष्ट्र शासनाचे असताना अनेक बँका शेतकऱ्यांना पिक कर्ज देताना नाहक त्रास देत आहेत. त्यामुळे बँकेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील आय सी आय सी आय बँकेच्या माचणुर व अरळी येथील शाखेत शेतकऱ्यांनी कर्ज मागणी केल्यानंतर तीन महिने सदर शेतकऱ्याकडून विविध कागदपत्रे मागणी केली, कोरोना आजाराचे भीती असताना शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्राची पूर्तता केली तरीही शेवटी सीबील खराब आहे, टॅब उपलब्द्ध नाहीत अशी वेगवेगळी कारणे सांगून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिला म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवेढा तहसीलदार स्वप्नील रावडे यांना सदर बँकेवर कारवाई करणे बाबत निवेदन देण्यात आले.


कारवाई न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.तसेच आय सी आय सी आय बँकेने आज पर्यंत एका ही शेतकऱ्यांना पीक कर्ज दिल की नाही अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.तसेच ज्या शेतकऱ्यांची शासनाने कर्ज माफ केली आहेत त्यांची माहिती त्या शेतकऱ्यांना देण्यास सुद्धा अरळी व माचनूर शाखेने असमर्थता दर्शवली असल्याचे निदर्शनास आले आहे.

बँकेत शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.अशा प्रकारे जर दुष्काळ, कोरोना, विविध अडचणीचा सामना करून जर शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहात असेल तर त्या बँकेवर तात्काळ कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ॲड.राहुल घुले, युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, शहराध्यक्ष हर्षद डोरले,नंदुर शाखाध्यक्ष शंकर संगशेट्टी, महादेव येडगे, राजेंद्र चव्हाण,व तक्रारदार शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!