ग्रामसंघाच्या अध्यक्ष पदी सौ.विजया बाबुराव पाटील
पंढरपूर ; ईगल आय मीडिया
देवडे ( ता.पंढरपुर ) या गावामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या अंतर्गत देवडे गावामध्ये २५ गट तयार केले होते. त्या सर्व गटांचे अध्यक्ष व सचिव यांची मिटींग घेऊन, सर्वांच्या मते रेणुका माता महिला ग्रामसंघ तयार करण्यात आला आहे.
या ग्रामसंघाच्या अध्यक्ष पदी सौ.विजया बाबुराव पाटील, सचिव पदी सौ.शितल दादा लांडे, कौश अध्यक्ष पदी सौ.लाडाबाई अनिल भोई, लिपीक पदी सौ.रेखा सुहास पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भुजबळ , वाखरी विभाग प्रमुख परचंडे, मा.पाटील , ग्रामसेवक मा.बिराजदार भाऊसाहेब, सदस्य मा.ज्ञानेश्वर सुतार, शेजाळ गुरुजी, समाधान करडे, विष्णु भोसले, सी.आर पी.सौ.वैशाली शंकर झांबरे, सौ.प्रियंका कडलासकर, सौ.विद्या ढेकळे, सौ.राणी कडलासकर व सर्व गटाचे अध्यक्ष, सचिव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मा.सोमनाथ झांबरे सर यांनी केले.