समाधान आवताडे यांना आमदार करा, 35 गावच्या योजनेसाठी दिल्लीतून निधी आणू

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अभिवचन


पंढरपूर : ईगल आय मीडिया


मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांचा पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गाजतोय मात्र पाणी दिलं गेलं नाही. समाधान आवताडे यांना आमदार करा, हे सरकार पैसे देेेऊ अथवा न देऊ केंद्रातील नरेंद्र मोदी यांचा सरकारकडून निधी आणून या साडेतीन वर्षाच्या आतच मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न सोडवू, असे अभिवचन राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


देवेंद्र फडणवीस यांच्या पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ सोमवारी मंगळवेढा शहर तसेच तालुक्यातील बोराळे, नंदेश्वर, डोंगरगाव तसेच पंढरपूर शहर तसेच तालुक्यातील गादेगाव, कासेगाव अशा सात सभा झाल्या.

या सभेला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार प्रशांत परिचारक खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजित नाईक निंबाळकर, महिला प्रदेश च्या चित्रा वाघ, आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार राम सातपुते आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सदाभाऊ खोत, लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्हा प्रभारी बाळा भेगडे, शेतकरी नेते पाशा पटेल, धैर्यशील मोहिते पाटील, शहाजी पवार, शशिकांत चव्हाण, यांच्यासह भाजप मित्र पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, दामाजी कारखान्याचे संचालक, विविध संस्थांचे अध्यक्ष सोसायट्यांचे चेअरमन विविध गावचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सांगायचे वीज कनेक्शन कट करणार नाही आणि अधिवेशन संपल्यावर लगेच कनेक्शन कट केली, त्यानंतर भरमसाठ बिले पाठवून शेतकऱ्यांकडून मागील दोन महिन्यांत 5 हजार कोटी वसूल केले, कोरोणाच्या नावाखाली मुंबईतील बिल्डरांना 5 हजार कोटीची सूट दिली, ती सूट मोगली जिजिया कर लावून भरून काढली, अशा या महावसुली सरकारला 2 मे रोजी विजेचा झटका देऊन समाधान आवताडे यांना आमदार करा असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.


उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज येऊन सांगत आहेत आम्ही इकडे पाणी पोचवू, तिकडे धरण बांधू, तिकडे कॅनॉल बांधून देऊ,आज आश्वासन दिले जात आहेत, पण हे लबाडाचं आवतन आहे हे जेवल्याशिवाय खरं नाही, भालके यांना तीन वेळा निवडून दिले, पण किती निधी आला? पण आमच्या सरकारने पाच वर्षात किती निधी दिला तपासून पहा.


पहिले महाविकास, नंतर महाभकास आणि आता महावसुली असे हे सरकार आहे, जाऊ तिथे खाऊ,सर्व काही ओरबाडून नेऊ असा कारभार चालू आहे, अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, अत्याचार करणाऱ्या या सरकारला जागा दाखवून देण्याची संधी या मतदारसंघातील मतदारांना मिळाली आहे नव्या विचाराने नवी क्रांती करण्यासाठी विकासाची नवी वाट दाखवण्यासाठी दमदार असणारे उमेदवार समाधान आवताडे हे आहेत,

येणाऱ्या 17 तारखेला कमळाला मतदान करून समाधान आवताडे यांना आमदार करा पुढील करेक्ट काय कार्यक्रम मी करतो असे सूतोवाच फडणवीस यांनी केले.
संपूर्ण देशात कोरूना ने सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झालेत सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत असे असताना यांच्याकडे बेड नाहीत, ऑक्सीजन नाही, सर्वसामान्यांना देण्यासाठी लस नाही आता राष्ट्रवादीवाले लस पुरवठा करत आहेत म्हणजे लस साठा यांनीच केला का ?असा प्रश्न उपस्थित करत तुमचा संताप, उद्रेक या निवडणुकीतून व्यक्त करा असे आवाहन फडणवीस यांनी केले.

Leave a Reply

error: Content is protected !!