जिल्हा कृषि कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सदाशिव भोसले यांची निवड

पंढरपूर : ईगल आय मीडिया

येथील सोलापूर जिल्हा कृषी कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी सदाशिव महादेव भोसले, व्हा. चेअरमन पदी राम हरी जाधव तर संदीप गंगाराम गायकवाड यांची संचालकपदी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक एस. एम. तांदळे व आर बी पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. पतसंस्थेचे जिल्हा कार्यक्षेत्र असून स्व: मालकीची इमारत आहे. सदरची निवडही एका वर्षासाठी आहे. यावेळी माजी चेअरमन राजकुमार ढेपे, माजी व्हा. चेअरमन विजया झेंडे तसेच संचालक सुधीर काशीद, सचिव उदय साळुंखे, डी.वाय. कांबळे, हुसेन तांबोळी, दादासाहेब मेलगे, प्रकाश गोटे, प्रतिभा मुखरे, अजिनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

कृषी कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक उलाढाल ही सोळा कोटी इतकी असून पतसंस्था संगणीकृत आहे. संचालक मंडळाने दाखवलेल्या विश्वासास पात्र राहून पतसंस्थेचा कारभार पुढे नेणार असल्याचे निवडीनंतर सदाशिव भोसले यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!