आदर्श प्राचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान
पंढरपूर : ईगल आय मीडिया
स्वेरी कॉलेजचे प्राचार्य बी.पी रोगे यांना अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्याकडून ‘उत्कृष्ट प्राचार्य’ म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल लोकराजा पतसंस्थेच्या चेअरमन तथा जि.प.सदस्या शैलाताई गोडसे यांनी संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी पुरस्कार च्या माध्यमातून पुढील कार्यास बळ मिळो तुमच्या कर्तृत्वाचा विचाराचा गौरव खरा अर्थाने झाला आहे. आपल्या हातून व मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी जनतेचे मुले संस्थेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे तयार होवो, अशा शुभेच्छा शैलाताई गोडसे यांनी दिल्या.
यावेळी संगीता पवार, लोकराजा पतसंस्थेचे सचिव विनोद कदम, नितिन काळे इ.उपस्थित होते.