डॉ. धवलसिंह मोहिते – पाटील कोरोना पॉझिटिव्ह

मोहिते – पाटील कुटुंबात कोरानाचा शिरकाव.

माळशिरस : ईगल आय मीडिया

जनसेवा संघटनेचे प्रमुख, माजी जि प सदस्य डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर मोहिते पाटील घरात ही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

कोरोनामुळे सोलापूर जिल्हात सर्वत्र हाहाकार माजला आहे.सोलापुर शहर व माळशिरस तालुका येथील बाधीताची संख्या लक्षवेधी ठरत आहे.या आपात्कालीन परीस्थितीत जनसेवा संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य ना आधार देण्याचे काम करत असताना दिवंगत लोकनेते माजी खा.प्रतापसिह मोहिते पाटील यांचे सुपुत्र व सोलापूर जिल्हा शिवसेनेचे माजी सहसंपर्कप्रमुख डॉ.धवलसिह मोहिते पाटील कोरोना कोविड१९ आजारानी बाधीत झाले आहेत.

डॉ. धवलसिंह कोरोनाच्या संक्रमण काळात जनसेवा करताना अनेकांच्या संपर्कात आले होते त्यामुळे पॉझिटिव्ह आल्याने ते नियमानुसार ‘गृह विलगीकरणा’त (Home Isolation) आहेत. मागील १४ दिवसात जे माझ्या संपर्कात आले असतील, त्यांनी स्वतःची चाचणी अवश्य करून घ्यावी.मी लवकरच यावर मात करून जनसेवेसाठी सज्ज राहीन असे आवाहन डॉ धवलसिह मोहिते यांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!