मळोली व बोंडले येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
टीम : ईगल आय मीडिया
मळोली ( ता. माळशिरस) येथे दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे अनेक जणांचे जनजीवन विस्कळीत झाले होते, अनेक सामाजिक संस्था संघटना यांनी या वेळी आपआपल्या पद्धतीने मदत करून या संकटात मदतीचा हात दिला.
ह भ प संतवीर बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून मळोली व बोंडले येथील 60 पुरग्रस्तना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या मध्ये,गहूपीठ,तेल , तांदूळ, ब्लँकेट, चटई यासह सुमारे 22 वस्तू असून याचे वाटप मळोली येथील विठ्ठल मंदिरात सरपंच श्री गणेश पाटील, वासुदेव जाधव, व्यसनमुक्त युवक संघाचे श्री नितीन माने देशमुख, रवींद्र जाधव, सुनीलजी पाटील, दिग्विजय जाधव, राजेंद्र जाधव पाटील, शिवाजीराव जाधव , शंकर माने,आदित्य पाटील,अथर्व पाटील उपस्थित होते. या संकटकाळी व्यसनमुक्त युवक संघाने जो मदतीचा हात दिलाय याचे ऋण आम्ही गावकरी कदापिही विसरणार नाही, असे मत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.
या वेळी श्रीमंत जाधव यांनीही स्वखर्चाने 20 सतरंजी व 20 ब्लँकेट चे वाटप केले.