व्यसनमुक्त युवक संघटनेची पूरग्रस्त गावास मोठी मदत

टीम : ईगल आय मीडिया

व्यसनमुक्त युवक संघ, आणि माऊली प्रतिष्ठान शेरे, व दुशेरे ग्रामस्थ यांचेकडून सावरडी ( ता. शाहूवाडी,जि. कोल्हापूर ) या गावातील संकटग्रस्त नागरिकांना मदतीचा मोठा आधार देण्यात आला असून 13 क्विंटल धान्य, 15 दिवसांच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.


कोल्हापूर जिल्ह्यातील कासारी नदीच्या महापुराने थैमान घालून अनेकांचे जीवन उध्वस्त करून टाकले शेती, घरे,दुकाने ,जनावरे यांची काही क्षणात वाताहत झाली,असंख्य लोकांच्या जीवनात या अचानक आलेल्या महापुराने होत्याचं नव्हतं करून टाकले आहे. मात्र कराडसह व माळशिरस, माण तालुक्यातील व्यसनमुक्त युवक संघटनेच्या शिलेदारांनी शुक्रवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी समाजातील लोकांच्या मदतीने 13 क्विंटल धान्य, साखर, कपडे, व किमान 15 दिवस पुरेल या पद्धतीचे किराणा साहित्य या भागातील आपल्या बांधवांना पोहोच केले. या गावातील 13 कुटूंबाची घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत.


शाहूवाडी तालुक्यापासून 25 किमी अंतरावर असणारं सावरडी हे गावं , सातवीपर्यंत शिक्षणाची सोय, बहुतांश लोक शेतीवर उपजीविका करणारे आहेेेत. कासारी नदीच्या पात्रापासून जवळ,चारही बाजूने डोंगर , पायऱ्यांची शेती, ऊस,भात ही उभी पिके अगदी भुईसपाट झालेली. मोठं मोठी झाडे, रस्त्यावर कोसळलेल्या दरडी, सर्व काही विचार करायला भाग पाडणार समोरच चित्र पाहून मन सुन्न झालं निसर्गाचा प्रकोप आणि त्याच्याशी झगडणारी माणसं दिसुुन येेेतात.

व्यसनमुक्त युवक संघाचे राजाराम पाटील, बाळासाहेब निकम, दादासाहेब नरळे, के पी जाधव, रवींद्र बोधले, विठ्ठल शेलार तसेच माऊली प्रतिष्ठानचे श्री दिलीप निकम, प्रदीप निकम, वैभव पाटील, शंकर सुतार व व्यसनमुक्त युवक संघ,सोलापूर जिल्हा अध्यक्ष दिपक जाधव यांच्यासह कोल्हापूर जिल्हा व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक श्री संदीप पाटील व श्री प्रकाश देसाई यांनी या परिसरातील ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या या वेळी पूरग्रस्त महिला भगिनी व सावरडी भागातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!