पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर फुलचिंचोली येथील सर्व सार्वत्रिक गणेशोत्सव मंडळाने गणेश उत्सव रद्द केलेे असून फुलचिंचोली ग्रामपंचायतीने तसा ठराव तालुका पोलीस निरीक्षक यांना दिला आहे.
नुकतीच ग्रामपंचायत कार्यालय येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात व गणेशोत्सव समिती, व पदाधिकारी यांची बैठक पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या पाच महिन्यापासून देशभरातील सर्व धार्मिक स्थळे बंद असून यात्रा-जत्रा रद्द करण्यात आल्या आहेत. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा फुलचिंचोली येथे सार्वजनिक मंडळाने गणेशोत्सव घरच्या घरी साजरा करण्याचा संकल्प केला,असून यंदा कोरोनाला हरवून पुढच्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात करू असा संकल्प केला आहे. व असा ठराव ग्रामपंचायत फुलचिंचोली यांनी दिला आहे. यावेळी ज्येष्ठ नेते कल्याणराव पाटील, सरपंच प्रतिनिधी अशोक जाधव, युवा नेते रमाकांत पाटील, पोलिस पाटील बालाजी माने, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी जाधव, पत्रकार सावता जाधव, गोपनीय शाखेचे पोलीस गजानन माळी, प्रकाश कोष्टी, विनायक क्षीरसागर आदीसह गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खरात व पोलीस यांनी ईश्वरवठार, पुळूज, तारापूर, सुस्ते,अजनसोड ,नारायण चिंचोली, आढीव, बाभूळगाव,मगरवाडी या गावातील गणेशोत्सव मंडळाशी प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन केले.