फुलचिंचोलीत भारत भालके यांना श्रद्धांजली
फुलचिंचोली : ईगल आय मीडिया
सर्वसामान्य जनतेचे आमदार म्हणून आ.भारत नानांची ओळख होती.सामान्य माणूस गेला तरी त्यांचे काम ते करत,त्यामुळे त्यांनी सर्वसामान्य जनतेमध्ये देखील घर निर्माण केले होते. आम्ही त्यांच्या मतदार संघात नसूनही नानांचे आमच्या गावासह इतर गावाकडे ते कटाक्षाने लक्ष देत कोणत्याही कार्यक्रमाला बोलवले तरी ते येत असत,त्यामुळे आ.भारत नाना भालके हे कायम स्मरणात राहतील असे भावनिक उदगार युवा नेते रमाकांत नाना पाटील यांनी काढले.
फुलचिंचोली (ता.पंढरपूर) येथे नाना पाटील ग्रुप व कै. बाळासाहेब पाटील सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने स्व.आ.भारत नाना भालके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी ते बोलत होते. प्रथम स्व.भारत नानांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी भैरवनाथ दूध संस्थेचे शहाजी पाटील, माजी सरपंच मारूती दादा वाघ,डॉ. किलमसे,सुनिल शिंदे, पत्रकार सावता जाधव,दत्ता घोडके,कोळी गुरूजी, समाधान गायकवाड, दत्ताभाऊ ढाळे, शुभम ढाळे, विलास पाटील, अनिल नवले,आकाश जाधव,सागर डोंगरे, रामदास गायकवाड, आण्णा वाघ आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.