करमाळा येथे नोंदणी करून लस घेणाऱ्यास पूर्व सूचना दिली जावी

ऍड.सविता शिंदे यांची मागणी

ऍड.सविता शिंदे

टीम : ईगल आय मीडिया

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात रोज येणाऱ्या कोविड लसींची संख्या रोजच्या रोज जाहीर करून त्या प्रमाणात लस घेण्यासाठी नोंदणी केलेल्या लोकांना पूर्व सूचना देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी, ॲड. सविता शिंदे यांनी केली आहे.

ॲड. सविता शिंदे पुढे म्हणाल्या की, सध्या उपजिल्हा रुग्णालय, करमाळा येथे दररोज कोविडची लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी होताना दिसते आहे. परंतु लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आधी नोंदणी केलेल्या लोकांनाही ती मिळत नाही. रुग्णालय परिसरात रोज ३००-४०० लोक गर्दी करत असल्यामुळे करोना नियमांची पायमल्ली होतेच आहे. शिवाय त्यामुळे करोना संसर्गाचाही धोका वाढत आहे.

वयस्क लोकांना तासनतास रांगेत थांबूनही लस मिळत नाही, त्यामुळे त्यांना अधिकचा शारीरिक व मानसिक त्रास होतानाही दिसतो आहे.
त्यामुळे प्रत्येक दिवशी किती लस उपलब्ध आहेत, याबाबत रुग्णालय प्रशासनाने दररोज माहिती जाहीर केली पाहिजे.

ज्या लोकांनी आधी ऑनलाईन अथवा ऑफलाईन नोंदणी केली आहे, तेवढ्याच लोकांना पूर्वसूचना देऊन बोलावल्यास गर्दीही होणार नाही व लसीकरणाच्या कामात सुसूत्रता येईल व लोकांचा त्रास कमी होईल असेही ॲड. सविता शिंदे म्हणाल्या.

Leave a Reply

error: Content is protected !!