कौठाळीत दूध उत्पादकांना बोनस

प्रशांत परिचारक दूध संस्थेच्या वतीने बोनस वाटप

पंढरपूर : ईगल आय मीडिया कौठाळी (ता. पंढरपूर ) येथील प्रशांत परिचारक सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या वतीने सभासदांना 20 टक्के बोनस वाटप युवक नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच शंकर गोडसे, माजी सरपंच महादेव गाढवे , सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ ,संस्थेचे अध्यक्ष सुखदेव उगळे , तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष ईश्वरा धूमाळ , उपसरपंचअरुण धमाळ, सोसायटीचे अध्यक्ष परमेश्वर धुमाळ, तंटामुक्त समितीचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत उगळे , ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष तानाजी धुमाळ, डाॅ पोपट नागटिळक, विलास पाटील यांच्यासह बहुसंख्य दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.

सूत्रसंचालन सचिन धुमाळ यांनी केले ,शेवटी आभार संतोष धुमाळ यांनी मानले

Leave a Reply

error: Content is protected !!