तर उपसरपंच पदी रामदास नागटिळक यांची निवड
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कौठाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी स्वाती दत्तात्रय धुमाळ यांची तर उपसरपंच पदी रामदास नागटिळक यांची बिनविरोध निवड झाली आहे.
आज झालेल्या सरपंच पदाच्या निवडी वेळी दोन्ही पदासाठी एकेक अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून, फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
कौठाळी ग्रामपंचायत निवडणूकित आ.परिचारक आणि काळे गटाने आघाडी करून सत्ता मिळवली होती. सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने आज सरपंच निवडी वेळी सरपंच पदासाठी स्वाती धुमाळ यांचा आणि उपसरपंच पदासाठी रामदास भीमराव नागटिळक यांचा एकेक अर्ज दाखल झाला. त्यामुळे दोन्ही निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या.
दोघांचेही अभिनंदन आणि शुभेच्छा 🌷🌷