टीम : ईगल आय मीडिया
कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, वनविभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती व शेती महामंडळ या विभागांशी संबंधित समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आज तहसील कार्यालय, कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनता दरबार पार पडला.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, कारभारी आगवन, संचालक पद्माकांत कुदळे, काकासाहेब जावळे, अशोकराव काळे, ज्ञानदेव मांजरे, पंचायत समिती सदस्य अनिल कदम, श्रावण आसने, मधुकर टेके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, युवक अध्यक्ष चारुदत्त सिनगर, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर दिलीप शिंदे, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, रोहिदास होन, राहुल रोहमारे, प्रशांत वाबळे, रावसाहेब साठे, राजेंद्र खिलारी, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पंचायत समिती कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे, सामाजिक वनीकरण विभागाच्या सौ. रक्ताटे, वनविभागाचे श्री. पोकळे, शेती महामंडळाचे सुरेश अभंग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्री रनशूर आदी उपस्थित होते.