टीम : ईगल आय मीडिया
समृद्धी महामार्गाबद्दलच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात आमदार आशुतोष काळे यांनी गुरुवारी समृद्धी महामार्ग ठेकेदार गायत्री कन्स्ट्रक्शन, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.
यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी समक्ष जाऊन समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली असता भूमिगत विजवाहिन्यांसाठी पाईपच टाकले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नाही अशी सक्त ताकीद आमदार मा.श्री. आशुतोष काळे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली.
तसेच सर्व कामे गुणवत्तेत व्हावी, खराब झालेले रस्ते सर्व्हे करून दुरुस्त करून द्यावे, भूमिगत वीजवाहिन्या टाकताना चांगल्या दर्जाचे पाईप वापरावे, तसेच पी.एफ.ची रक्कम वेळच्या वेळी जमा करण्यात यावी आदी सूचना आमदार काळे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गौतम सहकारी बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सीनगर, दिलीप शिंदे, सचिन आव्हाड, रोहिदास होन, सोपानराव आभाळे, विठ्ठलराव जावळे, केशवराव जावळे, सुधाकर होन, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, अंजनापूरचे सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, योगीराज देशमुख, नंदकिशोर औताडे, देवेन रोहमारे, विलास चव्हाण, कृष्णा शिलेदार, संतोष पवार, नरहरी रोहमारे, रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता एस.के.बावा, टीमलीडर प्रशांत ताडवे, वीज वितरण कंपनीचे श्री. सूर्यवंशी, श्री. निरगुडे, श्री. बोन्डकर, गायत्री कन्स्ट्रक्शनचे ताताराव डुंगा, आदी उपस्थित होते.