पंढरपूर : ईगल आय मीडिया
मका शेतमालाला हमी मिळावा यासाठी शासकीय गोदाम पंढरपूर व सांगोला या तालुक्यासाठी शासन हमी भाव केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
शासकीय गोदाम पंढरपूर मका हमीभाव केंद्राचे उदघाटन प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसिलदार वैशाली वाघमारे, सहाययक निंबधक सहकार एस.एम.तांदळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन शांतिनाथ बागल आदी उपस्थित होते.
केंद्र शासन दरवर्षी विविध प्रकारच्या शेत मालाला किमान आधारभूत किंमत जाहीर करत असते. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार मका हमी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन व मार्केटींग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मका हमी भाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार मका या शेतमालाचा हमी भाव प्रति क्विंटल 1760/- रुपये हमी भाव आहे. पंढरपूर तालुका खरेदी विक्री संघाकडे पंढरपूर व सांगोला तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांनी सुमारे 10 हजार क्विंटल मका विक्रीसाठी नोंद केली असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मका हमीभाव केंद्रावर सामाजिक अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक राहील. तसेच मका खरेदी केंद्रावर मका उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत-जास्त मका शेतीमाल विक्रीस आणून हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी मका खरेदी केंद्रावर स्वच्छ माल आणने आवश्यक आहे. मका उत्पादक शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघाकडे नोंदणी करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी मका पीक पेरा असलेला 7/12 चा उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स कागदपत्रे आवश्यक असल्याची माहिती सहाय्यक निंबधक सहकार एस.एम. तांदळे यांनी दिली.