माळशिरस : ईगल आय मीडिया

मळोली ( ता माळशिरस ) येथील डॉ हिमालय घोरपडे यांची राज्यसेवा स्पर्धा परीक्षेमधून तहसीलदार या पदावर निवड झाली आहे. मळोली ग्रामस्थाच्यावतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रा बाळासाहेब घोरपडे यांचे ते चिरंजीव असून त्यांनी या अगोदर डॉक्टर ही पदवी घेऊन त्या नंतर राज्यसेवा स्पर्धा परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मळोली गावच्या विदयार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या अगोदर 2018 मध्ये मळोली गावचा चि सुरज अनंतराव जाधव याने यु पी एस सी परीक्षेत देशात 151 रँक मिळवली होती. या दोन्ही युवकांच्या प्रेरणेने मळोली व परिसरातील विदयार्थी युवकांना नक्कीच आदर्श निर्माण झाला आहे. मळोली ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.