मळोली : ईगल आय मीडिया
मळोली ( ता. माळशिरस ) येथे पिनू उर्फ मारुती बबन जाधव हा हातभट्टी दारू अवैद्य मार्गाने विक्री करत असल्याचा सुगावा लागल्याने त्यास पोलिसांनी रंगेहात पकडून त्याच्याकडील दारू सह दोन हातभट्टी चे कॅन ,असा पाचशे रुपयांचा माल जप्त केला आहे.
वेळापूर पोलीस ठाण्याचे बिट अंमलदार भागवत झोळ,हवालदार चव्हाण व दोन होमगार्ड यांनी ही कारवाई केली. या वेळी त्यांना या कामी मळोलीचे पोलीस पाटील ऍड. संतोष पवार यांनी मदत करून गावामध्ये अशांतता पसरवून अवैद्य दारू विक्री करणाऱ्या या आरोपीस पकडून दिल्याबद्दल त्यांचे वेळापूर पोलीस ठाण्याच्या व मळोली ग्रामस्थांच्यावतीने विशेष कौतुक केले जात आहे.
ऍड संतोष पवार यांनी या कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये मळोली गावामध्ये शासनाच्या सर्व आदेशाचे तंतोतंत पालन करून गावामध्ये कोरोना या रोगासंदर्भात जनजागृती मोठ्या प्रमाणात केली आहे. ते व्यवसायाने वकील असून कायद्याच्या अभ्यासात ते निष्णात आहेत. मळोलीमध्ये अवैद्य दारू विकली जाऊ नये, यासाठी त्यांनी अनेक वेळा स्वतः जोखीम पत्करून या दारू विक्रेत्याना कायद्याचा बडगा दाखवून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या हातभट्टी दारू विक्रेत्यास पकडण्यासाठी त्यांना स्वतः या प्रकरणात उतरून पोलिसांना बोलावून आरोपीस जेरबंद केले.