मळोली : ईगल आय मीडिया
मळोली ( ता. माळशिरस ) येथे मळोली – कुसमोडच्या ओढ्यावरील सेतूचा प्रश्न आज ( दि. 18 ) सुटला. यासाठी माळशिरस पंचायतीचे सदस्य श्री रणजितसिंह जाधव यांनी या कामी लक्ष देऊन सेतू उभारला आहे.
सविस्तर वृत्त असे की, मळोली ते कुसमोड असा जाणारा रस्ता असून या मार्गावरून अनेक विद्यार्थी,शेतकरी तसेच ऊसाची वाहने जात असताना ओढ्यामध्ये पाणी व ओढ्यातील वाळू,दगड याचा त्रास होत असायचा. शालेय विद्यार्थी, व जेष्ठ नागरिक यांना या मार्गावरून जाताना जीव मुठीत धरून जावे लागायचे. याच मार्गावरून प्रत्येक वर्षी येणारा श्री संत गाडगेनाथ महाराज पालखी सोहळा जातो. याही येणाऱ्या पालखी सोहळ्यातील वैष्णवांना त्रास होत असे,जास्त पाऊस काळ झाला की चारचाकी वाहने येथून पुढे जात नसत.
रणजितसिंह जाधव हे पंचायत समितीचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत व चौदावा वित्त आयोगातील निधी वापरून या सेतूचे काम घालून केले.
या सेतुसाठी अंदाजे साडेआठ लाख रुपये खर्च झाला असून या सेतुचे काम अत्यंत चांगल्या पध्दतीने करण्यात आले आहे.
या मार्गावरून सुमारे दीडशे वरश्यापासून श्रीसंत गाडगेनाथ पालखी सोहळा जातो व नेहमीच या भागातील सर्व शेतकरी वर्गाची शेतातील धान्य,ऊस आदी पिकाची वाहतूक करणे सोपे झाले आहे. सेतूस ‘ शेतकरी,वारकरी’ असं नामकरणही करण्यात आलेले आहे.
या उदघाटनप्रसंगी प्रथम ,बैलगाडी,,या वाहनास प्रवेश देऊन शेतकरी वर्गासाठी हा सेतू खुला करण्यात आला.
या वेळी सरपंच श्री गणेश पाटील,तंटामुक्त अध्यक्ष शिवजी पाटील, मनोज जाधव, सत्यजित जाधव, राजाभाऊ जाधव, संजय गुरव,सोमनाथ पाटील,अमीर बागवान,दत्तात्रय महाडिक, नारायण पाटील, सुरेश जाधव, दिलीप जाधव, ऍड बाबाराजे कदम,दादासो देशमुख, मिलिंद जाधव,तानाजी जाधव, मोहन पवार,अमोल महाडिक, उमेश जाधव,आप्पासो जाधव, प्रशांत जाधव,विजय पाटील, अधिक पाटील,जगन्नाथ जाधव, शामकांत जाधव, विक्रांत जाधव,राकेश जाधव, संदीप जाधव, विजय जाधव, मदन जाधव, सोमनाथ काटकर, माऊली जाधव,पोपटराव काळे, बंटी तांबवे, सोपान वाघमारे, बापू जाधव,आदींसह ग्रामस्थ सुरक्षित अंतर ठेवून व मास्क बांधून उपस्थित होते.