माळशिरस : ईगल आय मीडिया
ग्रामीण रुग्णालय येथे केविड ऑक्सिजन उपचार केंद्राचा लोकार्पण सोहळा विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते प्रमुख उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यात कोविड च्या रुग्णांची वाढ होत असून रुग्णांस तातडीने आणि चांगले उपचार मिळावेत यासाठी या कोविड हॉस्पिटल चा उपयोग होईल .
ग्रामीण रुग्णालय माळशिरस केविड ऑक्सिजन उपचार केंद्र लोकार्पण सोहळयास माळशिरस च्या नगराध्यक्षा सौ द्रोपदी देशमुख, उपनगराध्यक्ष डॉ. मारुतीराव पाटील, पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते – पाटील, प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजीत पाटील, अकलूज उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर सुप्रिया खडतरे, माळशिरस ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर श्रेनिक शहा, माळशिरस पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी शिवाजीराव पाटील, रुग्ण कल्याण समिती सदस्य रामदास काळे ,शौकत पठाण, वस्ताद विजयराव देशमुख ,डॉक्टर स्मिता शिंदे डॉक्टर निखिल मिसाळ डॉक्टर राहुल गावडे माळशिरस मेडिकल असोसिएशन ॲन्ड ड्रगिस्टचे सदस्य निमा डॉक्टर संघटनेचे पदाधिकारी आदीसह , आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.