जिल्ह्यात 100 ठिकाणी घेणार रक्तदान शिबिर
पंढरपूर : ईगल आय मीडिया
लॉक डाऊनच्या काळात गरजू लोकांना धान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्यानंतर रक्तदान अभियान राबवण्याचा निर्धार मनसेने व्यक्त केला आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अनोखी मोहीम हाती घेण्यात आली असून आज फुलचिंचोली ( ता. पंढरपूर ) येथून अभियान सुरू करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपुर तालुका उपाध्यक्ष बालाजी वाघ यांनी फुलचिंचोली येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले की, कोरोना संकट काळात मनसेने जिल्ह्यातील गरजू लोकांना लॉक डाऊन च्या काळात अन्न धान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. आता कोरोनाचा प्रसार वाढत असून रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने रक्तदान अभियान हाती घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यात 100 ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्याचा निर्धार केला आहे.
यावेळी पंढरपुर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, रमाकांत ( नाना ) पाटील, माजी सरपंच मारुती वाघ, राजा शिवछत्रपती परिवाराचे प्रमुख सुरज पाटील, भीमा साखर चे संचालक बिभीषण वाघ, समाधान वाघ, मोहन दांडगे, राहुल डोंगरे, हिम्मत नागने,सोमनाथ कुंभार, सोमनाथ अवताडे, विश्वनाथ शिंदे, खंडू हजारे, डॉ, प्रसाद खाडिलकर, डॉ, किलमिसे,सिद्धेश्वर तोरखंडे, इत्यादी उपस्थीत होते.