पन्हाळी पत्रे आणि संसारोपयोगी साहित्य वाटप : दिलीप धोत्रे
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर नगरपालिकेने शहरातील विस्थापित नगरमधील लोकांची घरे आणि छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान केले. त्यामुळे त्यांचे घरावरील पत्रे आणि इतर साहित्याचे नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी मनसेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे यांनी केली असून जे काही नुकसान झाले आहे ते साहित्य आणि पन्हाळी पत्रे मनसेच्यावतीने धोत्रे यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाना दिले, त्यामुळे गोरगरीब कुटुंबाना दिलासा मिळाला आहे.
या विस्थापित नगर मधील अनेकांच्या घराचे , त्याचे पत्रे, वासे, लाईट कनेक्शन आदी साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यासाठी आपण मदत करणार असल्याचे दिलीप धोत्रे यांनी या भागातील भेटी दरम्यान सांगितले होते. यामुळे आज त्यांनी सर्वाना मदत केली.
यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड उपाध्यक्ष महेश पवार, मिलिंद गायकवाड, प्रताप भोसले, सागर बडवे, प्रथमेश पवार, नागेश इंगोले, इत्यादी उपस्थित होते,,