गरीब कुटुंबातील 10 विद्यार्थींनीना संगणक शिक्षणासाठी मदत
पंढरपूर : ईगल आय मीडिया
शहरातील दहा गरीब व गरजू मुलींना संगण शिक्षण घेता यावे, यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी आर्थिक मदत केली आहे. त्यांनी केलेल्या मदतीमुळे दहा गरीब विद्यार्थींनीना संगणकीय शिक्षण पूर्ण करता आले आहे.
लाॅकडाऊनमुळे अनेक गरीब कुटुंबे अडचणीत आली आहेत. अशातच मुला – मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करणे त्यांच्यापुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. हीच त्यांची समस्या ओळखून मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी गरीब व गरजू दहा विद्यार्थींनींचा संगणक शिक्षणाचा खर्च उचलून त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली आहे.
शासकीय नोकरीसाठी एमएससीआयटी हा तीन महिने कालावधीचा संगणक कोर्स आवश्यक आहे. हा कोर्स पूर्ण करण्यासाठी दहा विद्यार्थींना मदत केली आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, NIT कॉम्पुटर चे मालक शाम गोगाव सर, उपाध्यक्ष महेश पवार, विभाग प्रमुख नागेश इंगोले इत्यादी उपस्थित होते,,