झपाटलेला सह अनेक मराठी चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्याचे निधन
टीम : ईगल आय मीडिया
‘झपाटलेला’ या चित्रपटात बाबा चमत्कारिक ही भूमिका साकारणारे अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे गुरुवारी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
राघवेंद्र यांनी मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले होते.
त्यांनी अश्रूंची झाली फुले नाटकात धर्माप्पा ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका त्यावेळी विशेष गाजली होती. त्यांनी ‘ब्लक अँड व्हाईट’, ‘गौरी’, ‘सखी’, ‘कुठे शोधू मी तिला’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केले.
त्यानंतर ‘छोडो कल की बात’ या हिंदी चित्रपटात देखील त्यांनी भूमिका साकारली होती. बालगंधर्व परिवारतर्फे राघवेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.