पंढरपूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उपाध्यक्षपदी वाखरी ( तालुका पंढरपूर ) येथील मारुती श्रीरंग पोरे यांची निवड करण्यात आली. शनिवारी डीव्हीपी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.
मारुती पोरे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर तालुका उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. तालुक्यातील वीज, पाणी आदी शेतकऱ्याच्या प्रश्नांवर मारुती पोरे यांनी सातत्याने काम केले आहे. त्यामुळे त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड सार्थ ठरेल, असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तानाजी बागल, सोलापूर जिल्हा संघटक शहाजहान शेख, पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक साहेबराव नागणे, हनुमंत पोरे आदी उपस्थित.