रोज नवीन ठिकाण, नवीन गाव. मेंढपाळांचा परतीचा प्रवास सुरू

पंढरपूर : ईगल आय मीडिया
ऊन,वारा, पाऊस याची पर्वा न करता आपले घर, गाव सोडून मेंढ्यांचा कळप घेऊन घराबाहेर पडलेल्या मेंढपाळांनी आपला परतीचा प्रवास सुरू केला आहे. मजल-दरमजल करत ते आपापल्या गावी परतत आहेत.
दिवाळी दरम्यान आटपाडी, म्हसवड, दहिवडी, पिलीव, कटफळ, महूद आदी माण खोऱ्यातून मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन सोलापूर,बार्शी, मराठवाडा भागात चारण्यासाठी नेत असतात. यंदा कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले.त्यामुळे सर्व समाजासोबत मेंढपाळांचीही गैरसोय झाली. गेल्या तीन महिन्यांपासून मेंढ्यांचा बाजार बंद असून मेंढपाळांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांकडून उसनवारीने पैसे घेऊन ते आपला उदरनिर्वाह करीत आहेत. शेकडो मेंढ्यांचा कळप घेऊन फिरणाऱ्या मेंढपाळांचा मोकळ्या शेतात मेंढ्यांसह त्यांचा मुक्काम असतो. ज्याठिकाणी मेंढ्या बसविल्या आहेत, त्याठिकाणचे शेतमालक त्यांना धान्य देतात. त्यांची पाण्याची, राहण्याची सोय करतात. दरवर्षी दिवाळीनंतर सहकुटुंब आपले गाव सोडून मेंढपाळ बाहेर पडत असतात. मेंढ्या पालन करूनच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. याबाबत माहिती देताना कटफळ येथील हनुमंत लेंगरे म्हणाले, एका मेंढपाळाकडे पन्नास ते साठ मेंढ्या आहेत. सहकुटुंब आम्ही घराच्या बाहेर पडतो. यंदा परस्थिती पावसामुळे बरी आहे. वेळेत पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधानी आहे. दररोजचा अमचा सहा ते आठ किमीचा प्रवास असतो. मुक्कामाच्या ठिकाणी जेवण खान बनविले जाते. सोबत घोडे, पाळीव कुत्रे असतात.
आता या मेंढपाळाना घराची ओढ लागली आहे.

बाळूमामाचे मेंढ्या चे कळप प्रसिद्ध
कोल्हापूर भागातील आदमापुर येथील बाळुमामा देवस्थानचे मेंढ्यांचे कळत प्रसिद्ध आहेत. वाहनांच्या माध्यमातून ते चरण्यासाठी मराठवाडा भागात येत असतात. बाळूमामा मेंढ्यांचे कळप चारण्यासाठी शेतात बसवणे यासाठी वेटिंग असते.

Leave a Reply

error: Content is protected !!