पंढरपूर : ईगल आय मिडीया
वाखरी ( ता. पंढरपूर ) येथे असलेल्या mit कोविड केअर सेंटरला आवश्यक ते वैद्यकीय साहित्य आज सुपूर्द करण्यात आले. यामुळे या केअर सेंटरच्या मूलभूत गरजा पूर्ण होणार आहेत. सध्या या कोविड केअर सेंटरमध्ये कोविडचे 4 रुग्ण आणि संशयित असे 60 पेक्षा जास्त लोकांवर उपचार केले जात आहेत.
वाखरी येथील mit मध्ये कोविड केअर सेंटर 18 मेपासून सुरू करण्यात आले आहे. येथे कोविड पॉजीटीव्ह, हाय रिस्क, लो रिस्क आणि विलगिकरन अशा प्रकारचे रुग्ण ऍडमिट केलेले आहेत. सोलापूर शहरानंतर जिल्ह्यातील हे पहिलेच कोविड केअर सेंटर असून येथे 250 रुग्णांची व्यवस्था होऊ शकते. विशेष म्हणजे येथे संशयितांचे swab घेण्याची ही व्यवस्था असून येथे घेतलेले swab तपासणीनंतर रुग्ण पॉजीटीव्ह आल्याचेही निष्पन्न झाले आहे.
या कोविड केअर सेंटरमध्ये सध्या 60 पेक्षा जास्त लोक असून त्यांच्यावर तालुका आरोग्य विभागाचे पथक उपचार आणि देखरेख ठेऊन आहे. या सेंटरला आवश्यक असेलेली वैद्यकीय साहित्य आज अतिरिक्त जिल्हा आरोग्यधिकारी एस पी कुलकर्णी यांनी दिले. यावेळी पंचायत समिती सभापती अर्चना व्हरगर, आरोग्य सेवा समितीचे सदस्य तथा जि प सदस्य अतुल खरात, वाखरी जि प गटाचे सदस्य नानासाहेब गीसावी,गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले, आरोग्य पर्यवेक्षक सुभाष तनमोर आदींसह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.